शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पांढऱ्या सोन्याला सुगीचे दिवस येणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- बळीराजा कष्ट घेत आपल्या शेतात पांढरे सोने म्हणून पिकवत असलेल्या कापसाला आता सुगीचे दिवस येणार आहे.

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांतून नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना आता कापूस उत्पादनातून भरघोस नफा मिळणार आहे.

नेवासे तालुक्यासाठी मुळा सहकारी सुतगिरणीच्या प्रस्तावाला राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने मान्यता दिली आहे. उसापाठोपाठ कापसाचे आगार असलेल्या नेवासे तालुक्यात

मुळा सहकारी सुतगिरणीच्या माध्यमातून कापूस पिकावर आधारीत कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार आहे.

सरकारकडून मंजुरी मिळाल्याची माहिती राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली. गडाख म्हणाले, “राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग धोरणानुसार कापुस उत्पादक जिल्ह्यामध्ये

ज्या तालुक्यात सुतगिरणीला परवानगी द्यायची त्या तालुक्यात वर्षाला किमान 9 हजार 600 टन कापसाचे उत्पादन आवश्यक असते.

नेवासे तालुक्यात दरवर्षी 17 हजार ते 21 हजार हेक्टरवर कापसाची लागवड होत आहे. 12 हजार ते 22 हजार टनापर्यंत कापसाचे उत्पादन होत असते.

मंत्री गडाख म्हणाले सुतगिरणीच्या माध्यमातून आणखी एक कृषी प्रक्रिया उद्योग सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळू शकेल.

कापसावर प्रक्रिया करुन वेगवेगळ्या प्रकारचे कापड निर्मितीसाठी लागणाऱ्या सुताची निर्मिती नियोजित सुतगिरणीमध्ये होणार असुन हा प्रकल्प नेवासे तालुक्यातील वस्त्रोद्योगाची नांदी ठरणार आहे.

रोजगार उपलब्ध होणार सुतगिरणीची क्षमता 25200 चात्यांची आहे. प्रकल्प सुरु झाल्यावर तालुक्यातील तरुणांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होईल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24