अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- राज्यात अनलॉक १ ची नियमावली जाहीर करण्यात आली असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं आहे.
अंतिम वर्षाच्या विद्यार्थीसाठी आनंदाची बातमी आहे, अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.
अंतिम वर्षाच्या मुलांना सेमिस्टरची सरासरी काढून गुण दिले जाणार आहेत, अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत विद्यापीठांची मते जाणून घेतल्यानंतर आज हा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केला आहे.
तसेच ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी ज्यावेळी परीक्षा घेऊ शकतो त्यावेळी परीक्षेची संधी दिली जाणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews