अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- गृह कर्ज घेणाऱ्यांना सार्वजनिक क्षेत्रातील यूको बँकेने एक खुशखबर दिली आहे. यूको बँकेने गृह कर्जावरील व्याज दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे.
नवीन दर बुधवारपासून लागू झाले आहेत. सुधारित गृह कर्जावरील व्याज दर 6.90 टक्के पासून सुरू होईल असे बँकेने निवेदनात म्हटले आहे. कर्जाची रक्कम कितीही असली आणि कर्जदार काहीही काम करणारा असला तरीही हेच व्याजदर असतील.
इतर वित्तीय संस्थांनीही कपात केली आहे
- – अलीकडे मॉर्गेज लेंडर एचडीएफसी लिमिटेडने आपला रिटेल प्राइम लेन्डिंग रेट (आरपीएलआर) कमी केला आहे, तर बँक ऑफ बडोदाने एमसीएलआर कमी केला आहे. आता ग्राहकांना स्वस्त दरात गृह कर्ज, वाहन कर्ज मिळेल. एचडीएफसी लिमिटेडने गृह कर्जांवरील आरपीएलआरमध्ये 0.10% घट केली आहे.
- – बँक ऑफ बडोदाने विविध कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये 0.05 टक्क्यांनी कपात केली आहे. बँकेचे नवीन दर 12 नोव्हेंबर 2020 पासून लागू आहेत. बँकेतील सुधारित एक वर्षाची एमसीएलआर आता 7.45 टक्के आहे. त्याचबरोबर, एका दिवसापासून सहा महिन्यांपर्यंतच्या कर्जावरील एमसीएलआर 6.60 ते 7.30 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे.
- – बँक ऑफ महाराष्ट्रने रेपो लिंक्ड लेन्डिंग रेट (आरएलएलआर) मध्ये 0.15% कपात केली आहे. रेपो लिंक्ड लोनचे नवीन व्याजदर आता 6.90 % आहेत. नवीन व्याजदर 7 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.
- – त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँकेनेही गृह कर्जावरील व्याजदरात 0.15% कपात केली आहे. नवीन दर 1 नोव्हेंबरपासून लागू आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved