अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : भारतात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे,देशातीलआघाडीची ई-कॉमर्स सेवा देणारी Amazon India ही भारतात २० हजार तरुणांना नोकरी देणार आहे.
या कंपनीत हंगामी तत्वावर २० हजार कर्मचारी भरती करणार आहे.१२ वी उत्तीर्ण तसेच इंग्रजी, हिंदी आणि ज्या राज्यात काम करायचे आहे तिथल्या स्थानिक भाषेचे उत्तम ज्ञान असणाऱ्यांना कर्मचारी भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार आहे.
दरम्यान कोरोना संकटामुळे भारतात शॉपिंग मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स बंद आहेत. मात्र ऑनलाइन शॉपिंगला परवानगी आहे.यामुळे सध्या ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे.
याच मुळे ई-कॉमर्स क्षेत्रातल्या या बलाढ्य कंपनीने भारतात हंगामी तत्वावर कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
हंगामी तत्वावर घेतलेले नवे २० हजार कर्मचारी हे ठिकठिकाणी वर्क फ्रॉम होम पद्धतीने घरुनच ‘कस्टमर सर्व्हिस’ विभाग हाताळणार आहेत.
या कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या तक्रारी, ग्राहकांकडून होणारी चौकशी ही कामं नवे कर्मचारी हाताळतील. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल.
कंपनीच्या वतीने ग्राहकांशी इ मेल, चॅट, सोशल मीडिया आणि फोनद्वारे संवाद साधण्याचे काम नवे कर्मचारी करतील.
कंपनी सहा महिन्यांसाठी हैदराबाद, पुणे, कोइम्बतूर, नोएडा, कोलकाता, जयपूर, चंदिगड, मंगळुरू, इंदूर, भोपाळ, लखनौ या शहरांमध्ये कर्मचारी भरती करणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews