मुबई : खासगी डॉक्टरांना कोरोना संकटाच्या काळात पीपीई किट्सचे संरक्षण मिळावे अशी मागणी डॉकटर्सकडून वारंवार होत होती.
आता शहरातील कंटेन्टमेंट झोनजवळच्या आणि आतमधील खासगी दवाखाने सुरु ठेवणाऱ्या डॉक्टर्स यांना ही सुविधा मिळणार आहे.
याशिवाय रुग्णवाहीका चालक आणि क्लिनर यांनाही पीपीई किट्स उपलब्ध करुन देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या आदेशानूसार डॉक्टरांसोबत, रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हर आणि क्लिनर्स यांनाही पीपीई किट्स मिळणार आहेत.
या निर्णयामुळे कोरोना रुग्णांसाठी अधिक रुग्णवाहीका उपलब्ध होण्यात मदत मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळात रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात पुढे आल्या आहेत.
रुग्णवाहिका मिळण्यास उशीर लागल्याने काही रुग्णांचा मृत्यु झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याशिवाय पालिकेनं कोविड रुग्णांसाठी बेस्टच्या 72 मिनी बसेसचे रुपांतर तात्पुरत्या रुग्णवाहिकेत करण्यात येणार आहे.