अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या भावामध्ये चांगलाच चढउतार पाहायला मिळतो आहे. वेगाने भाववाढ होणाऱ्या सोन्याला काहीसा ब्रेक लागला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणेच देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर सातत्याने कमी होत आहेत. शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या विक्रीवर दबाव पाहायला मिळाला.
भारतात आज पुन्हा एकदा वायदा भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. घरेलू बजारात सोन्याची किंमत 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 50,653 रुपये प्रति 10 ग्रामवर आली आहेत.
त्यामुळे तब्बल 5547 रुपयांनी सोनं स्वस्त झालं आहे. तर चांदीचा वायदा भाव 61,512 रुपये प्रति किलोग्रॅमवर घसरला आहे. 17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रापासून देशात फेस्टिव्ह सीझन सुरू होत आहे,
यावेळी सोन्याची मागणी वाढू शकते. पण जर आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकी डॉलर वधारले तर घरेलू बाजारातही सोन्याचे किंमती आणखी कमी होऊ शकतात.
ऑगस्टमध्ये सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 56,200 , तर चांदी 80,000 प्रति किलोच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. आतापर्यंत सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 5547 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.
तर चांदीचा दर प्रति किलो 18488 हजार रुपयांनी घसरला आहे. सोन्याच्या किंमतीवर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी लक्षात घेता सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कारण अनेक देश त्यांची अर्थव्यवस्था मजबुत करण्याच्या प्रयत्नात आहेत. तज्ज्ञांच्या मते पुढील वर्षापर्यंत डॉलरमधील मजबुतीबरोबरच सोन्याच्या किंमतीत अचानक तेजी येऊ शकते.
मेरिकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांआधी काही अनुदानपर घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत.
जेव्हा अर्थव्यवस्था कमकुवत होते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात आणि जेव्हा अर्थव्यवस्था चांगली असते तेव्हा सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved