आनंदाची बातमी : सोने, चांदीत मोठी घसरण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- कोरोना काळात सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. परंतु आता सोन्याच्या किंमतीत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. याचे कारणही कोरोना परिस्थिती आहे.

काही दिवसांनी कोरोनाची लस बाजारात उपलब्ध होत आहे. त्यामुळे रुपयाची किंमत वाढली आहे. तसेच शेअर बाजारातही चांगली तेजी आल्याचे दिसत आहे. यामुळेच लोक सोने आणि चांदितील गुंतवणूक काढून इतर ठिकाणी लावत आहेत.

म्हणून सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोने ८००० तर चांदी १९००० हजार रुपयांनी कमी झाले आहे. सोन्याची किंमत फेब्रुवारी २०२१ पर्यत ४२,००० हजार रुपयांवर आलेली असेल.

तर चांदीच्याही दरात मोठी घसरण होणार आहे. असे गुंतवणूक जाणकरांनी सांगितले आहे. सोन्याचा भाव ऑगस्ट महिन्यात ५६,००० रुपये प्रति १० ग्रॅम असे होते.

यातील आता ८,०५८ रुपयांनी सोन्याचा भाव घसरला आहे. तसेच चांदीचा भाव ऑगस्टमध्ये ७८,२५६ रुपयांवर पोहोचला होता. तो आता ५९,२५० किलोग्रॅमवर आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24