अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून बाजारात येत असलेल्या कोरोना लस बाबतच्या बातम्यांमुळे शेअर मार्केटसह अनेक गोष्टींच्या किमतींमध्ये चढउतार निर्माण झाला आहे.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. अशातच आज देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीचे भाव घसरले आहेत.
नुकतेच जागतीक बाजारात दर घसरल्यामुळे भारतात सोन्याचे दर सोमवारी 104 रुपयांनी कमी होऊन 48,703 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले.
त्याचबरोबर दिल्ली सराफात तयार चांदीचे दर 736 रुपयांनी कमी होऊन प्रति किलोला 62,621 रुपये झाले. विशेष म्हणजे लोकांनी आता सोन्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे सोन्याची मागणी कमी झाली परिणामी बाजारावर परिणाम होऊन किंमतही कमी झाली आहे.
दरम्यान आज चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार फेब्रुवारी 2021 पर्यंत सोन्याचे दर हे 42000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर चांदीच्या दरातही घट दिसण्याची शक्यता आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved