अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- राज्यात कोरोनामुळे आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक ठिकाणी अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. परंतु या परिस्थितीमध्ये नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे.
राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागात मेगाभरती होणार आहे. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागात सुमारे तीन हजार पदांसाठी मेगा भरती निघणार आहे.
यामध्ये पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठातील जागाही भरल्या जाणार आहेत, अशी माहिती सुनील केदार यांनी दिली आहे.
या भरती प्रक्रियेची माहिती काही दिवसांत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सरकारच्या अनेक विभागातील भरती प्रक्रिया लांबणीवर पडलेल्या आहेत.
मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने विविध विभागांमधील भरती प्रक्रियांना चालना मिळण्याची शक्यता आहे.