अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर एकीकडे जिल्ह्यातील कोर्नाबाधितांची संख्या घटत आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्तांची संख्या वाढत आहे.
एकंदरीत नगर जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल आता अंतिम टप्यात आहे. जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ८०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६३ टक्के इतके झाले आहे.
सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १५३४ इतकी आहे. जाणून घ्या जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती (आकडेवारीमध्ये)
बरे झालेली रुग्ण संख्या:५१८०७
उपचार सुरू असलेले रूग्ण:१५३४
मृत्यू:८३५
एकूण रूग्ण संख्या:५४१७६
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved