महाराष्ट्र

गुड न्यूज आली ! रेल्वेत 11 हजार जागांसाठी भरती, पहा सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

नोकरीच्या शोधार्थ अनेक युवक असतात. कुठल्याही क्षेत्रात त्यांची काम करण्याची त्यांची तयारी असते. त्या अनुशंघाने ते अभ्यास, तयारी करत असतात. आता नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे.

रेल्वेत जवळपास १० हजार ८८४ पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती समजली आहे. यामध्ये स्टेशन मास्तर, तिकीट पर्यवेक्षक, तिकीट कारकून, गार्ड, लिपिक आदी पदांच्या जागा असणार आहेत.

रेल्वे बोर्डाचे संचालक (आरआरबी) विद्याधर शर्मा यांनी सर्व झोनच्या प्रधान मुख्य अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठवले असल्याची माहिती समजली आहे. नियुक्तीची माहिती भरती बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केली जाईल.

ही पदे पदवीपूर्व आणि पदवीधर दोन्हींतून भरली जातील. सर्व नियुक्त्या १६ झोनशिवाय उत्पादन युनिट्समध्येही केल्या जातील. उत्पादन युनिट्समध्ये १५४ व रेल्वे झोनलमध्ये १०,७३० पदे भरण्यात येतील. अकाउंट क्लर्कसह टायपिस्ट, लिपिक, कनिष्ठ लिपिक व टायपिस्ट,

ट्रेन क्लर्क ही पदवूपर्व पदे असतील. रेल्वेमध्ये नियमितपणे नियुक्तीसाठी यंदा भरतीचे वेळापत्रक लागू केले. याअंतर्गत दर तीन महिन्याला नियुक्तीसाठी जाहिरात देण्याचे निर्देश रेल्वे भरती बोर्ड व रेल्वे भरती सेल कार्यालयांना दिले असल्याचीही माहिती समजली आहे.

नोकरीच्या शोधार्थ अनेक युवक असतात. नोकरीची तयारी करणाऱ्या, नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. रेल्वेत जवळपास १० हजार ८८४ पदांची भरती करण्यात येतील.

असे असतील पदे
झोन                             पदे
पूर्व मध्य                       247
मध्य                           1243
पूर्व किनारपट्टी               778
पूर्व                             1079

उत्तर मध्य                    616
ईशान्य                        246
उत्तर सीमांत                 773
उत्तर                           816

उत्तर पश्चिम                  180
दक्षिण मध्य                    332
दक्षिण पूर्व                     542
दक्षिण किनारपट्टी          1046
दक्षिण                           819
दक्षिण पश्चिम                  555

Ahmednagarlive24 Office