आनंदाची बातमी : तर भविष्यात अहमदनगरमध्येही धावणार बुलेट ट्रेन !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- सध्या देशात अनेक ठिकाणी बुलेट ट्रेनचे काम सुरू असून, नगर शहरासाठी भविष्यात बुलेट ट्रेनची मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी सांगितले आहे.

जलयुक्त शिवार योजना शहरात सुरू करून त्यासाठी निधी उपलब्ध करून द्या असे सांगतानाच जिल्हा नियोजन समितीतून शहरातील आमदारांना शहर विकासासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

नागपूर येथे सध्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात नगर शहराचे आ. संग्राम जगताप यांनी नगर शहराचे विविध प्रश्न उपस्थित केले.

शहराच्या विकासासाठी भरीव निधी द्यावा, अशी पुरवणी मागणी सभागृहात केली. ग्रामीण भागात ग्रामसडक योजना असून ती शहरी भागात राबविल्यास महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यांचे चित्र बदलेल.

नगरची महानगरपालिका ही ‘ड’ वर्ग असून, त्यामध्ये एका गावाचा समावेश आहे. त्यामुळी जिल्हा नियोजन समितीतून अल्प निधी मिळतो. महापालिकेच्या स्वतःचे उत्पन्नाचे स्त्रोत राहिलेले नाहीत.

जकात, एलबीटीतून मिळणारे उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले आहे. पेन्शन, कर्मचाऱ्यांचे पगार, विजबिले भरू शकत नाही. रस्त्यांच्या कामासाठी निधीची मागणी केल्यास निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते.

मनपा अडचणीत असून अनुदान व निधी मिळाल्यास विकासकामांना गती मिळेल, यासाठी बजेटमध्ये पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आ. जगताप यांनी केली.

जलयुक्त शिवार योजनेते शहरी भागाचा समावेश केल्यास तसेच निधी उपलब्ध करून दिल्यास शहरामध्ये नदी, नाले, ओढे यांच्या माध्यमातून कामे होतील.

कोल्हापूरमध्ये पावळ्यात मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. ती अन्य शहरामध्ये होऊ नये, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24