आनंदाची बातमी : बहुचर्चित उड्डाणपूलाच्या कामास अखेर….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  अहमदनगर शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा बहुचर्चित उड्डाणपूलाच्या कामास अखेर गती मिळणार आहे.

संरक्षण मंत्र्यालयाकडून याबाबतीत ना हरकत प्रमाण पत्र प्राप्त झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सकारात्मक धोरणामुळे हे शक्य झाले आहे.

संरक्षण मंत्रालयाकडून बहुप्रतिक्षीत असलेली उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले असल्याने उड्डाणपूलाच्या कामासाठी आता केवळ

नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाला वर्क ऑर्डर काढण्याची औपचारिकता पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.पुढील महिन्यांमध्ये कामास प्रत्यक्ष सुरुवात होईल, असा विश्वास खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केला.

उड्डाणपूलाच्या कामासाठी संरक्षण मंत्रालयाची ना हरकत प्रमाणपत्र गरजेचे होते. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत हा प्रश्न येत असल्याने केवळ अहमदनगरच्या उड्डाणपूलाला सोयीचे व्हावे म्हणून देशाचे धोरण अनुकूल करण्यात आले.

त्यासाठी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी संरक्षण दलाच्या सर्व अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीची ही फलनिष्पत्ती असल्याचे सुद्धा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हंटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24