अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- सध्या कोरोनामुळे सगळीकडे संकटाचे वातावरण असले तरी सुशिक्षित बेरोजगारांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आशेचा किरण दाखविला आहे. आरोग्य खात्यात आगामी दीड महिन्यात बम्पर भरती करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आरोग्य खात्यामध्ये १७ हजार ३३७ जागा रिक्त आहेत. मेडिकल एज्युकेशनला ११ हजार जागा रिक्त आहेत. महापालिकांच्या हॉस्पिटलमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. या सगळ्या जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या सगळ्या जागा पुढील दीड महिन्यात भरण्यात येणार आहेत. यासाठी कोणतीही परिक्षा घेण्यात येणार नाही. त्यांचे गुण, अंतर्गत परिक्षा यावरून या जागा भरल्या जाणार आहेत असे ते म्हणाले.
नर्सिंग कॉऊन्सिल, MBBS ची झालेली परीक्षा, पीजीचे मार्क हे विचारात घेतले जातील. सध्याची कोरोनाची दुर्दशा पाहता राज्यात मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे.
मुंबईला तत्काळ बेड मिळायला हवेत. जूनपर्यंतचा डबलिंग रेट पाहता मुंबईमध्ये लाखभर पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यासाठी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच १५००० मध्यम बाधित रुग्ण आणि १००० आयसीयु बेडची व्यवस्था करण्य़ात येत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुंबईची तुलना कोणत्याही शहराशी करू नये.
कारण मुंबईत मोठमोठ्या झोपडपटट्या आहेत. दाट लोकवस्ती आहे. यामुळे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत कमी रुग्ण सापडत आहेत. मुंबईत आठ मोठे अनुभवी अधिकारी काम करत आहेत.
तसेच काही अधिकारी, संस्था यामध्ये काम करत आहेत. आमदारानाही यामध्ये सहभागी करण्यात येत आहे. पण मुंबई महापालिकेने रिक्त जागा भरण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरातही भरती करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com