अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अखेर नगरच्या बहुर्चित, बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला आज (२९ जुलै) सुरवात होणार आहे. दुपारी एक वाजता साधेपणाने हा कार्यक्रम होणार आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
विखे पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर या कामाला वेग आला. अलीकडेच संरक्षण मंत्रालयाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
अखेर सक्कर चौकात साधेपणाने या कामाची आजपासून सुरुवात झाली. दरम्यान काल रात्रीच उशिरा याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली होती.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com