Google office : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधल्या गुगल ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल एका व्यक्तीने केला होता. यामध्ये पुण्यातील गुगलचे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यामुळे याबाबत चौकशी सुरू आहे. बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण बिल्डिंगची तपासणी करण्यात आली. यावेळी कुठेही वस्तू संशयास्पद आढळून आली नाही. मात्र याठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस अधिकारी आणि बीडीडीएस पथकाकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली आहे. याबाबत एका व्यक्तीला हैद्राबादमधून ताब्यात घेण्यात आले आहे. हा व्यक्ती दारूच्या नशेत होता आणि अशात त्याने हा कॉल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण बिल्डिंगची तपासणी करण्यात आली. यावेळी कुठेही वस्तू संशयास्पद आढळून आली नाही. पोलीस अधिकारी आणि बीडीडीएस पथकाकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली आहे.
पोलीस तपासात असे समोर आले आहे की, धमकी देणाऱ्या व्यक्तीचा भाऊ पुण्यात वास्तव्यास आहे. त्या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच गोष्टीचा राग मनात धरून या व्यक्तीने भावाला त्रास व्हावा, म्हणून दारूच्या नशेत थेट गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी दिली.
दरम्यान या धमकीचा कॉलनंतर याठिकाणी मोठा गोंधळ उडाला होता. यामुळे याबाबत लगेच तपासणी केली गेली. मात्र यामध्ये काहीही समोर आले नाही. यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.