Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Government employees : मोठी बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, बैठक ठरली यशस्वी..

Government employees : गेल्या काही दिवसांपासून जुनी पेन्शन पुन्हा सुरू करण्यासाठी सुरू असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. राज्‍य सरकारसोबत बैठक झाल्यानंतर संप मागे घेण्‍यात येत असल्‍याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतला. यामुळे आता मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे अनेकांचे मोठे हाल सुरू होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गेल्या सात दिवसांपासून राज्यातील कर्मचारी संपावर गेले होते. त्यांनी विविध मागणीसाठी कामबंदची हाक दिली होती. राजपत्रित अधिकारी संघटनेबरोबर आज सरकारची या संदर्भात चर्चा झाली. अखेर याबाबत आज निर्णय घेण्यात आला आहे.

आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर संप मागे घेण्यात आला. राज्य सरकारी निमसरकारी समन्वय समिती यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सकारात्मक तोडगा निघाला आहे. त्यामुळे हा संप मागे घेण्यात येत असल्याचे समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पंचनामे करण्यासाठी तरी संप मागे घेण्यात यावा अशी मागणी केली जात होती. यामुळे आता मोठा दिलासा मिळाला आहे. अनेकांनी हा संप मागे घेण्यासाठी मागणी केली होती.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यामुळे याचे पंचनामे करण्यासाठी कोणीही जात नव्हते. यामुळे राज्य सरकारवर देखील दबाव वाढत होता. अखेर याबाबत आज घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता सर्व कामे सुरळीत होणार आहेत.