महाराष्ट्र

Maratha Reservation : आरक्षण दिल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही ! अहमदनगर मध्ये गाजली जरांगेंची सभा

Published by
Ahmednagarlive24 Office

Maratha Reservation : सरकारला मराठा आरक्षण देण्यासाठी पुरावे मिळत नव्हते. सरकारने एक पुरावा मागितला होता, त्यांच्यासाठी पाच हजार पुरावे गोळा केले आहेत. या पुराव्यांमुळे कायद्याला आधार द्यायला व कायदा पारित करायला सरकारला अडचण नाही.

सरकारने ४० दिवसांत कायदा पारित करून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावेत. मराठा समाज आता गप्प बसणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. आरक्षण दिल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. सरकारला मराठा आरक्षण द्यावेच लागेल, त्याशिवाय स्वस्थ सणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

शनिवारी (दि.७) मध्यरात्री १२.३० वा. नगर शहरातील एमआयडीसी परिसरातील रेणुकामाता मंदिरासमोर आयोजित सभेत जरांगे पाटील बोलत होते. ते म्हणाले, १ जून २००४ चा सुधारित जी. आर. आरक्षणाचा पर्याय त्यांच्यापुढे आहे.

मराठा व कुणबी एकच आहे. गायकवाड कमिशनने मराठ्यांना मागास सिद्ध केले आहे. सरकारसमोर आता कुठलीही अडचण नाही; पण सरकार व समिती दिशाभूल करत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजाला मराठा हाच वेगळा प्रयोग तयार करून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण सरकार देऊ शकते.

ज्या कायद्यात मराठ्यांचे हित नाही, तो कायदा पारित केलेला आम्ही स्वीकारणार नाही. मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात आहे. सरकार आपल्याकडून एक महिन्याचा वेळ घेऊन गेले. १४ ऑक्टोबरला सरकारचा एक महिना पूर्ण होणार आहे. त्यात आपण आहे.

सरकारसमोर आता कुठलीही अडचण नाही; पण सरकार व समिती दिशाभूल करत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजाला मराठा हाच वेगळा प्रयोग तयार करून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण सरकार देऊ शकते.

ज्या कायद्यात मराठ्यांचे हित नाही, तो कायदा पारित केलेला आम्ही स्वीकारणार नाही. मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात आहे. सरकार आपल्याकडून एक महिन्याचा वेळ घेऊन गेले. १४ ऑक्टोबरला सरकारचा एक महिना पूर्ण होणार आहे. त्यात आपण सरकारला आणखी १० दिवस दिले आहेत.

२४ ऑक्टोबरला सरकारला दिलेला ४० दिवसांचा वेळ पूर्ण होत आहे. सरकारने कितीही डाव टाकू द्या सर्व डाव उधळून लावणार. आंदोलनासाठी ३५ मराठी बांधवांनी बलिदान दिले आहे. मराठी समाज हा शेती कसणारा समाज आहे. त्यामुळे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी हा लढा पहिला व शेवटचा आहे.

मराठा समाजाने कधीही जातिवाद केला नाही. ७५ वर्षे मराठा समाजाने सर्व पक्ष व विविध पक्षातील नेत्यांना मोठे करायचे काम केले आहे. ओबीसी समाज व आपण सर्व एकच आहोत. १९१३ पासून मराठा समाजाला आरक्षण लागू आहे.

कुठली चौकशी न करता ओबीसी समाजाला ६० टक्के मराठा समाजाला ३४ टक्के मग इतर समाजाची आरक्षणाची टक्केवारी किती? असा सवाल यावेळी जरांगे यांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांची सभा नगरमध्ये मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी (दि.७) सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र जरांगे पाटील यांचे नगरकडे येताना अनेक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले व तेथेही छोट्या-मोठ्या सभा पार पडल्या. मध्यरात्री साडे बारा वाजता जरांगे पाटील यांचे नगरच्या सभेच्या ठिकाणी आगमन झाले.

यावेळी त्यांचे उत्स्फूतपणे स्वागत करण्यात आले. मध्यरात्रीच्या सुमारासही प्रचंड मोठी गर्दी जरांगे यांच्या सभेला होती. समाजबांधवांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषात शिवरायांच्या पुतळ्यास वंदन करण्यात आले. सभेला उशीर झाल्याबद्दल जरांगे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली व जो उत्स्फूर्त सहभाग दर्शविला त्याबद्दल आभार व्यक्त केले.

महिलांचीही मध्यरात्री मोठी गर्दी होती, त्यांनाही जरांगे यांनी वंदन केले. यावेळी समाजातील सर्व घटक उपस्थित होते. अगदी दिव्यांग बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते. एमआयडीसी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

पोलिसांचे काम स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात हलके केले. रात्री २ वाजता जरांगे पाटलांची सभा संपली. नगर शहराने मध्यरात्रीच्या सुमारास एवढी मोठी सभा क्वचितच अनुभवली असेल.

Ahmednagarlive24 Office