महाराष्ट्र

Government Scheme: मागेल त्याला शेततळे योजना पाण्यात!! फडणवीसांची योजना ठाकरेंनी गिळली; बळीराजा संकटात

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 Thackeray Government :  गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये अस्मानी संकट आणि सुलतानी संकटांचा देखील समावेश आहे.

शेतकरी बांधवाना शेती करण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते मात्र, शेतकरी बांधवांकडे (Farmers) पाण्याचा साठा उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत असे यासाठी शासनाने वारंवार जलसंधारणाच्या योजना देखील कार्यान्वित केल्या आहेत.

अशाचं योजने पैकी एक असलेली मागेल त्याला शेततळे योजना (Magel Tyala Shetatale Yojna) शेतकऱ्यांसाठी मोठी फायदेशीर सिद्ध होत होती. मात्र, आता या योजनेला ठाकरे सरकारने (Thackeray Government) पूर्णविराम दिला आहे.

या योजनेचा फायदा घेत अनेक शेतकरी बांधवांनी शेततळ्याची निर्मिती केली आणि यामुळे त्यांच्या उत्पादनात भरीव वाढ झाली.

या योजनेची सुरुवात खरं पाहता युतीच्या काळात (the alliance of bjp and shivsena) झाली होती, आता सरकारचा तक्ता पलटी होताचं या योजनेला पूर्णविराम लागला असल्याने पुन्हा एकदा बळीराजा राजकारण्यांच्या भक्षस्थानी गेल्या असल्याच्या भावना आता व्यक्त होत आहेत.

मागेल त्याला शेततळे नामक योजना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना प्रणित युती सरकारच्या काळात सुरू करण्यात आली होती.

या योजनेची सुरुवात 2015 या साली अर्थात फडणवीस मुख्यमंत्री असताना झाली होती. या योजनेअंतर्गत अनेक शेतकरी बांधवांनी कृषी विभागाकडे कागदपत्रांची पूर्तता करून लाभ घेतला होता.

या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना खोदकाम तसेच अस्तरीकरण व तार कंपाउंड यासाठी अनुदान स्वरूप रक्कम दिली जात होती. या योजनेसाठी राज्यातील लाखो शेतकरी अर्ज करत असत मात्र त्यातील काही मोजक्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात असे.

असे असले तरी या योजनेमुळे शेकडो शेतकरी सुखावले होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत झाली होती, आणि पाण्याचा प्रश्न अनेकांचा मिटला होता त्यामुळे त्यांच्या उत्पादनात देखील मोठी वाढ झाली होती.

आता मात्र ठाकरे सरकारने मागेल त्याला शेततळे योजना बंद केली आहे. या योजनेसाठी अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले होते मात्र ते मंजूर होण्यापूर्वीच या योजनेचा शेवट करण्यात आला आहे.

या योजनेसाठी मिळत असलेले अनुदान हे खूपच तोकडे होते. एवढ्या नगण्य अनुदानात शेततळ्याचे काम पूर्ण करणे हे खरंच खूप चॅलेंजिंग काम होते.

मात्र असे असले तरी या योजनेचा शेतकरी बांधवांना हातभार लागत होता. आता या योजनेला फुल स्टॉप लावला गेला असल्याने शेतकरी बांधवांना शेततळे बांधण्यासाठी सर्व पैसे स्वतः खर्च करावे लागणार आहेत.

मागेल त्याला शेततळे योजना राजकारणाच्या भोवऱ्यात सापडली होती आणि यामुळेच या योजनेचा शेवट झाला. परंतु योजनेचा शेवट झाल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना धक्का बसला आहे. एकंदरीत फडणवीस सरकारची योजना ठाकरे सरकारने गिळली आहे असेच म्हणावे लागेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office