विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री शिंदे यांच्याच हस्ते, आयोगाची परवानगी

Maharashtra news:राज्यात सत्तांतराच्या हालचाली सुरू असताना यावर्षी मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते होणार? यावरून मोठी चर्चा रंगली होती.

उध्दव ठाकरे असतील की नवे मुख्यमंत्री असतील अशी ती चर्चा होती. अखेर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाली. त्यामुळे या पुजेचा मान त्यांनाच मिळणार हे नक्की झाले. मात्र, त्यानंतर पुन्हा एक अडचण आली.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

काल निवडणूक आयोगाने नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यामध्ये पंढरपूरचाही समावेश आहे. त्यामुळे आचारसंहिता सुरू असताना मुख्यमंत्री शिंदे पूजा करून शकणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता.

यासंबंधी प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण मागितले. आयोगाने मुख्यमंत्री शिंदे यांना विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, निवडणुकीवर प्रभाव पडेल अशा घोषणा त्यांना करता येणार नाही.मुख्यमंत्री शिंदे सध्या दिल्लीत आहेत. रात्रीच ते परत येऊन पंढरपूरमध्ये दाखल होतील. रविवारी पहाटे त्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार आहे.