Dhangar Reservation : धनगर आरक्षणप्रश्री विश्वास ठेवावा असे सरकारचे वागणे, बोलणे वाटत नाही. विश्वासहतां वाटतच नाही मग आणखी दोन महिन्यांचा वेळ द्यायचा कसा असा प्रश्न उपोषणकर्ते आण्णासाहेब रूपनवर, सुरेश बंडगर व यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले व सहकार्यांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे उपोषणकर्ते आपल्या उपोषणावर ठाम असून सरकारला जाग आणण्यासाठी धनगर समाजाने आंदोलन तीव्र करावे असे आवाहन माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केले. यावेळी सरकारने काढलेल्या हजारो कोटी रुपयांच्या जी. आर पत्राची धनगर बांधवांनी चौंडी येथे होळी करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेले उपोषणकर्ते आण्णासाहेब रूपनवर यांनाही चौडीमध्ये आणले आहे. श्वास असेपर्यंत उपोषण सोडणार नाही असे उपोषणकर्ते आण्णासाहेब रूपनवर, सुरेश बंडगर यांनी ठामपणे सांगितले.
चीडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मुंबई येथील बैठकीत समाधानकारक निर्णय झाला नाही. सरकार मराठा समाज व धनगर समाजासाठी वेगवेगळा न्याय करत असल्याचा आरोप करत सरकारची भूमिका निषेधार्थ आहे.
भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना कोणत्याही सरकारने आतापर्यंत न्याय दिला नाही. आता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे तीनही पक्ष एकाच वेळी सत्तेत सहभागी आहेत. निवडणुकीच्या तोंडावर गोड आश्वासन देणारे हे तीनही पक्ष आता धनगर समाजासाठी काही भूमिका घेणार का याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
बैठकीत सरकारशी बोलणी निष्फळ झाल्यानंतर राज्यभरातुन चौडीमध्ये धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. सरकार धनगर समाजाची चेष्टा करत आहे, तेव्हा आंदोलनात आक्रमक भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त तरूण करत होते.