राज्यपाल घटनेचे पालन करणारे नाहीत; राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले खरे पण या दोन्ही शिंदे आणि ठाकरे गटामध्ये अनेक विषयांवरुन वाद झाले. या दोन्ही गटामध्ये सध्या निवडणूक चिन्हावरुन वाद सुरु आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

हे सरकार बेकायदेशीर आहे. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपालांनी बहुमताचा ठराव घेण्यासाठी सांगणं बेकायदेशीर आहे. आम्हाला विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी तारीख दिली नाही. पण हे सरकार येताच लगेच तारीख दिली. राज्यपाल घटनेचे पालन करणारे नाहीत हे सर्वांचं म्हणणं आहे. एकतर्फी पद्धतीने निर्णय घेण्यात आले. झुंडशाहीने हे सरकार तयार करण्यात आलं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आमची खरी शिवसेना आहे. तुमचं चिन्ह तुम्ही निर्माण करा ना…पक्ष सोडल्यावर त्यांनी शिवसेना सोडली म्हणावं. ज्या दिवशी ते म्हणतील त्यांची आमदारकी रद्द होईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.