गोविंदाने ४९ व्या केले होते ‘हिच्या’ सोबत दुसरे लग्न

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-गोविंदाने हिंदी सिनेमासृष्टीवर चांगलेच वर्चस्व गाजवले. गोविंदाचे चाहता वर्गही खूप मोठा आहे. परंतु चाहत्यांना धक्का बसेल अशी एक बातमी समोर आली आहे.

गोविंदाने ४९ व्या वर्षी दुसरे लग्न केले होते. पण गोविंदाने दुसरे लग्न दुसरे कोणासोबत नव्हे तर त्याच्या पत्नीसोबतच केले होते. त्यामुळे जास्त आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गोविंदाचे लग्न सुनीतासोबत ११ मार्च १९८७ ला झाले होते. सुनीता आणि गोविंदा यांनी अनेक वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले होते. त्यांनी पुन्हा लग्न का करण्याचा विचार केला हे खूपच इंटरेस्टिंग आहे.

सुनीता आणि गोविंदा यांनी १९८७ मध्ये घरातील अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत मंदिरात लग्न केले होते. हे लग्न त्यांनी सगळ्यांपासून वर्षभर लपवले होते.

गोविंदा त्याकाळात अभिनेता म्हणून नुकतेच आपले स्थान निर्माण करत होता. त्यामुळे त्याच्या लग्नाबद्दल त्याच्या फॅन्सला कळले तर त्याच्या महिला चाहत्यांचे प्रमाण कमी होईल असे त्याला वाटत होते.

त्यामुळेच त्यांची मोठी मुलगी नम्रताच्या जन्मापर्यंत त्यांनी ही गोष्ट कोणालाच सांगितली नव्हती. गोविंदा आणि सुनीता यांनी लपूनछपून लग्न केले ही गोष्ट गोविंदाला पटली नव्हती.

त्यामुळेच लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाला त्यांनी धुमधडाक्यात सगळ्यांच्या उपस्थितीत पुन्हा लग्न केले

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

 

अहमदनगर लाईव्ह 24