महाराष्ट्र

Greenfield Expressway: महाराष्ट्रात होणार 230 किमी लांबीचा सहा पदरी नवीन महामार्ग! पुणे- नगर- संभाजीनगर अंतर होणार कमी

Published by
Ajay Patil

Greenfield Expressway:- महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर महामार्गांचे जाळे विकसित करण्यात येत असून या माध्यमातून महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहरे एकमेकांना जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे नक्कीच भविष्य काळामध्ये जेव्हा हे महामार्ग वाहतुकीसाठी खुले होतील तेव्हा त्यांचा फायदा हा कमीत कमी वेळेमध्ये प्रवासासाठी तर होईलच परंतु ग्रामीण भागातील विकास आणि कृषी व उद्योग क्षेत्रासाठी देखील मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

उदाहरणच घ्यायची झाले तर नागपूर ते मुंबई यादरम्यान झालेल्या समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी झाले आहे. परंतु अनेक दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.

अगदी याच पद्धतीने जर नागपूर ते संभाजीनगर हा २३० किलोमीटर लांबीचा होऊ घातलेला 6 पदरी ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे पाहिला तर यामुळे नागपूर ते संभाजीनगर हे अंतर चार तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. तसे संभाजीनगर वरून पुणे अवघ्या दोन तासात गाठता येणार आहे.

 पुणे संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे साठी सामंजस्य करार

राज्यामध्ये पुणे- अहमदनगर- संभाजीनगर असा 230 किलोमीटर लांबीचा सहा पदरी नवीन ग्रीनफिल्ड महामार्ग तयार होणार असून याकरिता केंद्राच्या रस्ते परिवहन व महामार्ग विभाग व महाराष्ट्र सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला असून या महामार्गामुळे पुणे शहराची समृद्धी महामार्गासोबत कनेक्टिव्हिटी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

इतकेच नाही तर या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे मुळे नागपूर ते संभाजीनगर हे अंतर चार तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे व इतकेच नाही तर संभाजीनगर वरून पुणे फक्त दोन तासात गाठता येणार आहे. एकूण 230 किलोमीटर लांबीचा हा 6 पदरी ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे असणारा असून या तीनही जिल्ह्यांच्या विकासासाठी हा ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे येणाऱ्या काळात महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.

कारण जर आपण संभाजीनगर पासून पुणे पर्यंतचा प्रवास पाहिला तर नगर मार्गे प्रवास करताना या रस्त्यावर प्रचंड प्रमाणामध्ये वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते.

तसेच हा नवीन महामार्ग तयार झाल्यानंतर पुणे शहराला थेट समृद्धी महामार्गाची कनेक्ट करता येणार आहे. त्यामुळे पुणे, नागपूर तसेच मुंबई या महत्त्वाच्या शहरांची कनेक्टिव्हिटी देखील तयार होणार आहे.

 या महामार्गावर असणार सहा टोलनाके

पुणे-अहमदनगर-संभाजीनगर या महामार्गावर सहा ठिकाणी टोल असणार असून त्यामुळे उत्पन्न चांगले मिळेल व साधारणपणे शंभर कोटी रुपये दर महिन्याला या माध्यमातून उत्पन्न मिळेल. हा रस्ता तयार करण्याकरिता कर्ज काढून जास्तीचे भांडवल उभे करता येईल.

कारण या रस्त्यावर वाहतूक खूप राहणार आहे असे देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले. या महामार्गामुळे नागपूर ते संभाजीनगर चार तासांमध्ये आणि संभाजीनगर वरून पुणे दोन तासात जाता येणार आहे.

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या या

सूचना

पुणे शहरापासून नगर मार्गे संभाजीनगर ला जाताना रस्त्यावर जी काही अतिक्रमण आहेत ते काढून आजूबाजूला सर्विस रोड बनवा तसेच नवीन बांधला जाणारा हा महामार्ग उत्तम बनवा. जुन्या रस्त्याशी यांना नव्या रस्त्याला जोड रस्ता ही द्या व रस्त्याच्या बाजूला बीड आणि नगर जिल्ह्याचे जे दुष्काळी भाग आहेत त्या ठिकाणी नवीन औद्योगिक वसाहती तयार करण्याच्या सूचना देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या.

संभाजीनगर पासून पुण्यापर्यंत ग्रीनफिल्ड हायवे तयार होत असून संभाजीनगर ते नगर आणि नगर ते पुणे यादरम्यान वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात असते व वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे या नवीन  6 पदरी महामार्गाची आवश्यकता होती असे देखील त्यांनी म्हटले.

त्यासोबतच नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग जेव्हा पूर्णपणे सुरू होईल तेव्हा पुणे शहराला समृद्धी महामार्गाशी कनेक्ट करणे शक्य होईल व ते आवश्यक देखील होते. या नवीन ग्रीन फील्ड एक्सप्रेस वेमुळे ही कनेक्टिव्हिटी शक्य होणार आहे.

त्यामुळे नागपूर आतून सहा ते सात तासात पुणे पोहोचणे शक्य होणार आहे. केंद्राच्या रस्ते परिवहन व महामार्ग विभाग व महाराष्ट्र सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या झालेल्या या सामंजस्य करारावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.

Ajay Patil