पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले जिल्ह्यामध्ये लॉकडाउन लागू होणार नाही परंतु…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोना संसर्ग यामुळे जिल्ह्यातील काही सामाजिक संघटना आणि काही राजकीय पक्ष तसेच जिल्ह्याचे खासदार सुजये विखे पाटील हे सातत्याने जिल्ह्यामध्ये काही दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाउन लावावा अशी मागणी करत होते.

परंतु जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जिल्ह्यामध्ये लॉकडाउन लावण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे .

ते म्हणाले जिल्ह्यामध्ये लॉकडाउन लागू होणार नाही परंतु स्थानिकपातळी वर आपण आपल्या सवलतीनुसार लॉकडाउन करू शकता. आज जिल्हात जवळ पास कोरोना बांधीत रुग्ण्याची संख्या ३३ हजार ८१३ वर पोहचली आहे.

मागच्या २४ तासात ९०३ कोरोना बांधीत रुग्ण आढळले आहे आणि २० कोरोना बांधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये लॉकडाउनची मागणी सातत्याने काही सामाजिक आणि राजकीय पक्ष करत आहे .

केंद्र शासनाने आता लॉकडाऊन करण्यास मनाई केलेली आहे. स्थानिक पातळीवर जनता कर्फ्युचा अवलंब केला जावू शकतो. यात प्रशासनाचा थेट सहभाग नसेल.

नगरमध्ये जनता कर्फ्युबाबत सर्वांनी एकत्र येवून निर्णय घेतल्यास पालकमंत्री म्हणून माझा पाठींबा असेल. आमदार, महापौरांनी याबाबत सर्वसहमतीने निर्णय घ्यावा,

असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे. नगरमध्ये आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24