Maharashtra News : गुटखा बंदी विरोधात केलेल्या आंदोलनावुरुन माझ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सुमारे ३२ आमदारांनी प्रश्न उपस्थित केला. मात्र,
या हल्ल्याच्या घटनेनंतरही नगर जिल्ह्यातील परिस्थिती बदलेली नाही. त्यामुळे राज्यातील गुटखा बंदी ही फसलेली असल्याचा आरोप हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे.
गुटखा बंदी आणि गुटख्याचे दुष्परिणाम याबाबत जागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे होते. सामाजिक कार्यकर्ते किंवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जनजागृती करण्याची गरज असताना प्रशासन स्तरावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
माझ्यावर हल्ला झाल्यानंतर प्रशासनामध्ये थोडी चलबीचाल झाली. मात्र कुठल्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय किंवा अॅक्शन सरकारकडून होताना दिसत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील सर्वच भागात गुटखा आणि मावा खुलेआम विक्री जोरात सुरू आहे. मात्र, अन्न औषध प्रशासन याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत आहे. महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून टपऱ्या लावण्यात येतात, तरीही महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.