अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात सध्या अवैधरीत्या गुटखा साठवणूक व विक्री करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
यांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासन देखील चांगलेच सतर्क झाले आहे, दरम्यान न्यायालयाच्या एका निर्णयामुळे आता गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत.
अवैधरीत्या गुटखा विक्री करणाऱ्या विरोधात मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यासंदर्भात चा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवण्यात आला असून लवकरच यासंदर्भात निर्णय होईल अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी संदर्भात भारतीय दंड संहितेच्या कलम 188 व 328 कलम लावण्यात येत होती. परंतु काही गुटका व्यापाऱ्यांनी या संदर्भाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती.
न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल दिला होता , या निकालाच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनान विभागाने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती 7 जानेवारी 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सरकारची बाजू ऐकून घेत औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
त्यामुळे आता राज्यांमध्ये अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 188 सोबतच कलम 328 लावला जाणार आहे त्यामुळे अवैधरीत्या गुटखा विक्री करणा-यांची मुस्के आवळे जाणार आहे