अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गोरेगाव परिसरात राहणारी एक शेतकरी महिला वय ३८, ही शेतात कांद्याचे पीक काढण्यासाठी जात असताना आरोपी विक्रम रंगनाथ तांबे, संकेत विक्रम तांबे या दोघांनी महिलेचा हात धरून तिला पकडून लगट करुन जवळ ओढून तुला सोडणार नाही, असे म्हणून अश्लील बोलून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला.
छाया विक्रम तांबे या महिलेने पिडीत महिलेच्या पतीलाही शिवीगाळ केली व चापटीने मारहाण केली. तुम्ही जर आमच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली तर आम्हीही तुमच्याविरूद्ध खोटी फिर्याद देवू, अशी धमकी दिली.
काल साडेनऊ वाजता हा प्रकार घडला. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी विक्रांत तांबे, संकेत तांबे, छाया तांबे यांच्याविरुद्ध पारनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेकॉ कदम हे पुढील तपास करीत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved