HDFC Bank Dividend : शेअर बाजारात अनेकजण गुंतवणूक करता असतात. जर तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण HDFC बँकेने एक मोठी घोषणा केली आहे.
दरम्यान, खाजगी क्षेत्रातील बँक HDFC बँकेने शनिवारी आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्रति इक्विटी शेअर 19 रुपये म्हणजेच 1900 टक्के लाभांश जाहीर केला आहे. याचा लाभ मिळणार गुंतवणूकदारांना मिळणार आहे.
लाभांशाची घोषणा
इक्विटी शेअर्सवर लाभांश मिळविण्यासाठी पात्र असलेल्या गुंतवणूकदारांची पात्रता निश्चित करण्याची रेकॉर्ड तारीख 16 मे 2023 ही ठेवण्यात आली आहे. HDFC बँकेने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, “संचालक मंडळाने त्यांच्या बैठकीत 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या वर्षासाठी निव्वळ नफ्याच्या प्रत्येकी पूर्ण भरलेल्या (म्हणजे 1900 टक्के) 1 रुपये प्रति इक्विटी शेअरसाठी 19 रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे.
बँकेला नफा
यासोबतच एचडीएफसी बँकेने मार्च तिमाहीचे आकडेही जाहीर केले आहेत. बँकेच्या निव्वळ नफ्यात वाढ झाली आहे. एचडीएफसी बँकेने शनिवारी जानेवारी-मार्च 2023 (Q4 FY23) साठी तिच्या स्वतंत्र निव्वळ नफ्यात 16.53 टक्क्यांनी वाढ नोंदवून रु. 12,047 कोटींवर पोहोचले.
त्याचे निव्वळ व्याज उत्पन्न 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत 23.7 टक्क्यांनी वाढून 23,351.8 कोटी रुपये झाले, जे एका वर्षापूर्वी रु. 18,872.7 कोटी होते.
एचडीएफसी बँक
त्याच वेळी, बँकेच्या CASA (चालू खाते बचत खाते) ठेवी 11.3 टक्क्यांनी वाढल्या आहेत. याशिवाय त्याच्या बचत खात्यात 5,62,493 कोटी रुपये आणि चालू खात्यात 2,73,496 कोटी रुपये जमा आहेत.
31 मार्च 2022 रोजी संपलेल्या वर्षाच्या तुलनेत 2022-23 पूर्ण आर्थिक वर्षासाठी HDFC बँकेचा निव्वळ नफा 19.3 टक्क्यांनी वाढून 44,108.7 कोटी रुपये झाला आहे.