‘तो’आरोप ठरला खोटा, माजी मंत्री राम शिंदे पुन्हा पडले ….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  सहा जून रोजी कुकडीचे आवर्तन सुटणार असल्याचे आमदार पवार यांनी जाहीर केले होते. मात्र माजी मंत्री राम शिंदे यांनी एक जून रोजी कर्जत तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करत

कुकडीचे सहा जून रोजी आवर्तन सुटणार नाही. असे सांगून आमदार पवार यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता.

परंतु कुकडी डावा कालव्याचे आवर्तन ६ जून रोजी सायंकाळी येडगाव धरणातून ५०० क्यूसेक क्षमतेने आवर्तन सोडले आहे. त्यामुळे माजीमंत्री राम शिंदे यांनी आमदार पवार यांच्यावर केलेला आरोप खोटा ठरला असून ते परत तोंडघशी पडले आहेत.

कुकडी कालव्याचे उन्हाळी आवर्तन नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदे व कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांसाठी सोडण्यात आले आहे. कुकडीच्या आवर्तनातून शेतीऐवजी पाझर तलाव पिण्याच्या पाण्यासाठी भरण्यात येणार आहेत.

यात श्रीगोंदे तालुक्यासाठी पाच दिवस, कर्जत ७ व करमाळा ६ दिवस असे आवर्तन देण्यात येणार आहे. दरम्यान कुकडीचे आवर्तन ठरलेल्या तारखेनुसार सोडण्यात आले आहे.

मला कुकडीच्या पाण्यावरून कोणतेही राजकारण करावयाचे नाही, तर कुकडी लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना मग ते कोणत्याही तालुक्‍यातील असो.

त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी नियमितपणे व नियोजनानुसार कसे मिळेल, यावरच माझा भर आहे आणि भविष्यात देखील राहील, असेही आ.पवार यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24