अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) ने कॉन्टॅक्टलेस रुपे डेबिट कार्ड लॉन्च केले आहे.
देशातील कोणताही ग्राहक कोणत्याही एसबीआय होम शाखेत जाऊन हे कार्ड घेऊ शकतो. बँकेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे. या कॉन्टॅक्टलेस कार्डच्या माध्यमातून अवघ्या एका टॅपद्वारे 5 हजार रुपयांपर्यंत पेमेंट करता येणार आहे.
या कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यावरच केवळ फायदा होणार नाही तर अन्य चित्रपट आणि किराणा सामान खरेदीवर रिवॉर्ड प्वाइंट्सही मिळतील. हे रिवॉर्ड प्वाइंट्स चित्रपट आणि किराणा सामान सारख्या खर्चासाठी रिडीम केले जाऊ शकते.
खरेदीवर 0.75% लॉयल्टी प्वॉइंट :- एसबीआयने जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, ग्राहकांना इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपांवरुन पेट्रोल आणि डिझेल खरेदीवर 0.75% लॉयल्टी प्वॉइंट मिळतील. कार्डद्वारे दरमहा तेल विकत घेण्यास मर्यादा नाही.
हे कार्ड वापरुन तुम्हाला इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपांवर लॉयल्टी प्वॉइंट मिळतीलच पण डाइनिंग, मूवीज, ग्रॉसरी आणि यूटिलिटी बिल्ससाठी पैसे भरण्यासाठी याचा वापर केल्यासही रिवार्ड पॉईंट मिळतील.
कार्ड सुरक्षित आणि सोयीस्कर आहे – एसबीआय चेअरमन :- एसबीआयने जारी केलेल्या निवेदनात बँकेचे अध्यक्ष दिनेक कुमार खारा म्हणाले आहेत की ‘टॅप अँड पे’ तंत्रज्ञानासह को-ब्रँडेड कार्ड ग्राहकांना अनेक आकर्षक फायदे देईल.
कार्डधारकांना इंधन खरेदी करण्याचा फायद्याचा अनुभव मिळेल. हे कार्ड सुरक्षित आणि सोयीस्कर आहे जे ग्राहकांना दररोजच्या खरेदीसाठी पैसे देण्यास सुलभ करेल.