अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- टाळेबंदीच्या काळात नेवासा तालुक्यातील निंभारी येथील पवार बंधूंनी जुन्या दुचाकीची चक्क चारचाकी गाडी बनवून एक वेगळाच विक्रम केला आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पवार बंधूंच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे. दरम्यान याबाबाबत सविस्तर माहिती अशी कि,
निंभारी येथील स्थापत्य अभियंता शिक्षण झालेल्या मात्र सध्या शेती करत असलेल्या जनार्दन पवार यांच्या मॅकेनिकल इंजिनियरचा डिप्लोमा करत असलेल्या युवराज,
दहावी शिकत असलेला प्रताप व त्यांचा सातवी शिकलेल्या चैतन्य मकासरे यांनी लॉकडाऊनचा मोकळा वेळ सार्थकी लावत जुन्या दुचाकी मोटारसायकल पासून चारचाकी मोटार तयार केली आहे.
धुळ खात पडलेली दिडशे सीसीची पल्सर मोटारसायकलपासून चारचाकी मोटारची निर्मिती करण्यापुर्वी युवराजने तिचे डिझाईन बनविले.
गबाळात पडलेले लोंखड व पत्रे घेवून पवार बंधुनी दोन महिन्यात पाच व्यक्तीकरीताची चारचाकी गाडी तयार केली आहे. बाजारातून गेअरबॉक्स आणून ही मोटार मागे घेण्याची सोय केली आहे.
दरम्यान हि गाडी तासी सत्तर किलोमीटर वेगाने धावू शकते. युवराजने यापुर्वी टाकाऊ वस्तूपासून लॉन कटिंग यंत्र, हरबरा पेरणी यंत्र, कपाशी पीकात अंतर मशागतीचे कोळपणी यंत्र तसेच लाकडाच्या विविध खेळणी तयार केलेल्या आहेत.
दरम्यान जुन्या दुचाकी मोटारसायकलपासून चारचाकी मोटार तयार केल्याने त्यांचा हा कारनामा परिसरात चांगलाच चर्चेत आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved