अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- पोलीस ठाणे परिसरात दुचाकी लावू नकोस असे सांगितल्याचा राग आल्याने एका तरुणाने चक्क पोलीसास शिवीगाळ व धक्काबुकी केली.
तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील पोलिसाला दिली. दरम्यान हि धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली.
याप्रकरणी पोलीस नाईक राहुल बबन यादव यांनी फिर्याद दिली असून नेवासा पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत घडलेली घटना अशी कि, फिर्यादीनेत म्हंटले आहे की, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी प्रवरा संगम बाजारात पेट्रोलिंग करून पोलीस चौकी येथे आलो असता
राजेंद्र केरू राजगुरू वय २४ रा. जवळके ता. नेवासा हा पोलीस चौकी समोर विनानंबरची मोटारसायकल लोकांना अडथळा होईल अशी लावत होता.
त्यास मोटारसायकल लावू नकोस असे म्हंटले असता त्याच्या मनात राग येऊन अंगावर धावून येऊन गचांडी धरून सरकारी गणवेश फाडला व धक्काबुकी केली.
माझ्या नादी लागशील तर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करील अशी धमकी दिली. यावरून नेवासा पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved