अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- विविध गुन्ह्यात मागील तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतले.
राजू किसन गांगर्डे, (वय 40, रा. धोत्रे खुर्द, ता. पारनेर) असे आरोपीचे नाव असून धोत्रे शिवारातून त्यास ताब्यात घेतले.
पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, पोलीस नाईक सुनील चव्हाण, संदीप पवार, भागीनाथ पंचमुख,
पोलीस कॉन्स्टेबल विनोद मासाळकर व योगेश सातपुते यांना हा आरोपी धोत्रे शिवारात मासे पकडत असल्याची खबर मिळाली होती.
त्यानुसार त्याला ताब्यात घेवून पारनेर पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews