शिवसेना शहरप्रमुखांच्या बदलीसाठी ते जाणार थेट मुख्यमंत्र्यांच्या दारी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  दिवंगत नेते अनिल भैय्यांच्या जाण्याने पोरकी झालेली शहरातील शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे.

नुकतीच झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून उलट सुलट चर्चा होते आहे. आता नगरसेवक गणेश कवडे यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख यांच्याकडून सेनेच्या नगरसेवकांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे.

तसेच नगरसेवक व पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेऊन शहरप्रमुख बदलीची मागणी करणार आहे, असेही कवडे यांनी स्पष्ट केलेयं.

शहरात शिवसेनेमध्ये कधीही जातीयवादाला थारा दिला जात नाही, असे नगरसेवक गणेश कवडे यांनी म्हटले आहे. पक्षाकडून (स्व.) अनिल भैय्या राठोड व शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी जाहीर केलेल्या नावांनाच स्वीकृत करण्यात आले.

काका शेळके यांनी त्यावेळेस का विरोध केला नाही, त्याचा विरोध फक्त मराठा समाजसाठीच आहे आणि संपर्कप्रमुख बदलाबाबत काका शेळके यांचा बोलविता धनी कोण आहे, हे शिवसैनिक व नगरकरांना माहिती आहे,

असा टोलाही कवडे यांनी लगावला आहे. शहरप्रमुख बदलाची मागणी करणार असल्याचेही कवडे यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाप्रमुख व शहरप्रमुख यांच्याकडे सदस्य नोंदणी फॉर्मची मागणी केली असता

ते उपलब्ध करून दिले नाही. यांच्या या वागणुकीमुळे आम्ही नगरसेवक व पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेऊन शहरप्रमुख बदलीची मागणी करणार आहे,

असेही कवडे यांनी स्पष्ट केलेयं. दरम्यान, नगरसेवक कवडे यांच्या या प्रत्युत्तरानंतर शिवसेनेतील अंतर्गत वाद वाढणार का, किंवा वेळीच वरिष्ठ नेते यामध्ये लक्ष घालत तो मिटवणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24