हृदयद्रावक! ‘त्या’ सेवानिवृत्त पोलिसाचा चौथ्या दिवशी ‘असा’ आणि ‘येथे’ सापडला मृतदेह

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-  सध्या अहमदनगर जिल्ह्यात सर्वदूर भरपूर पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील पाणीसाठे, जलाशय तुडुंब भरले आहेत.

परंतु अनेक ठिकाणी यामुळे दुर्घटना घडल्याचेही समोर आले आहे. अशीच एक दुर्घटना प्रवरा नदी पायी ओलांडताना सेवा निवृत्त पोलिस मधुकर दादा बर्डे यांच्या बाबतीत घडली.

ते यातवाहून गेले होते. त्यांचा मृतदेह तब्बल चौथ्यादिवशी पाचेगावपासून सुमारे १८ किलोमीटरवरील वाशिम टोका (ता. नेवासे) येथे प्रवरानदी पात्रात तरंगतांना सापडला.

बर्डे हे मंगळवारी दुपारी पाचेगाव (ता. नेवासे) येथून प्रवरा नदी ओलांडून पात्रातून पायी इमामपूर येथे घरी जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवरा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती.

त्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी इमामपूर येथील दहा- पंधरा युवकांची शनिवारपर्यंत शोध मोहीम त्याच परिसरात एक- दोन किलोमीटर सुरु होती.

मात्र बर्डे यांचा मृतदेह घटनास्थळापासून सुमारे ११ किलोमीटरवर असलेल्या वाशिम टोका (ता. नेवासे) येथे शनिवारी (ता. २६) सकाळी प्रवरा पात्रात तरंगतांना आढळून आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24