महाराष्ट्र

ऑगस्टनंतर भरपूर पाऊस, अतिवृष्टीची शक्यता, शेतकऱ्यांसाठी चांगले वर्ष..जगप्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत

Published by
Ahmednagarlive24 Office

महाराष्ट्रामध्ये अनके ठिकाणी देवस्थानच्या ठिकाणी भाकीत वर्तवण्याची परंपरा आहे. तर काही ठिकाणी वेगळ्याच पद्धतीने भाकीत वर्तवले जाते. जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी व त्यांनी वर्तवलेल्या भाकितासाठी जगप्रासिद्ध आहे.

येथील भाकिते खरी ठरत असे म्हटले जाते. आज शनिवारी पहाटे सहा वाजता भेंडवळची घटमांडणी वर्तवण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांना भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने आस लागलेली असते.

काय करण्यात आले भाकीत 
यंदा पीक परिस्थिती व पाऊसही सर्वसाधारण राहील. त्याचप्रमाणे यंदा पावसाळ्यापेक्षाही अवकाळी पाऊस जास्तहोणार असल्याचे सांगितले आहे. सुरुवातीच्या दोन महिन्यात पावसाळा कमी तर नंतरच्या दोन महिन्यात भरपूर पाऊस पडेल असे भाकीत वर्तवण्यात आले आहे.

जून, जुलै हे महिने कमी पावसाचे तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस बरसेल असे भाकीत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे परकीय देशांपासून देशाला कुठलाही धोका नसून देशाचा राजा कायम राहील असेही समोर आले आहे.

पहिल्या महिन्यात लहरी स्वरूपाचा पाऊस, तिसरा महिना एकदम चांगला व चौथ्या महिन्यातही पाऊस बरसेल. खरिपाची पिके साधारण राहतील तर रब्बीच्या हंगामात गव्हाचं पिक उत्तम असेल. पिकांवर रोगराईचा परिणाम होऊ शकतो असेही सांगण्यात आलं आहे.

या घटमांडणीतून मागच्या वर्षी जे भाकित करण्यात आलं होतं ते 90 टक्के खरं ठरल्याचे यावेळी उपस्थित भावीक सांगत होते.

संकटांबाबतही भाकीत
भावात तेजी-मंदी राहणार असून पृथ्वीवर संकटे येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. भारताची संरक्षण व्यवस्था मजबूत राहील त्याचप्रमाणे शत्रूंच्या कुठल्याही कारवाया यावर्षी होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. चाराटंचाई जाणवणार नसल्याचे व देशाची आर्थिक परिस्थिती चांगली राहणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे.

 

 

Ahmednagarlive24 Office