मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांमध्ये झाले मोठे नुकसान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी मुसळधार पावसाने नगरकरांना अक्षरश झोडपून काढले आहे. यातच आता गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.

यातच जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टी, आणि सोसाट्याचा वारा यामुळे दाणादाण उडवली. नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात विशेष करून दक्षिण नगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

यामध्ये कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, पारनेर तालुक्यातील झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेले पिकं पाण्यात गेली आहे.

अनेक ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे. जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील करपडी गावातील पुरामुळे शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे.

तसेच गावातील मंदिर, स्मशानभूमी, पाण्यात आहेत तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांच्या भिंती पडल्या असून घरात पाणी शिरलेले आहे.

कर्जत तालुक्यातील करपडी गावातील पुरामुळे गावाचा पुल आणि शिंपोरा बाभल गावचा ओढ्यावरिल पूलही पूर्ण वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतूक प्रभावित झाली आहे.

तसेच शेवगाव पाथर्डी तालुक्यातही मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेली आहे. यामुळे या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

परतीच्या पावसाचा कहर जिल्ह्यात अद्यापही कायम आहे, तसेच पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24