राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. 20 सप्टेंबरपासून पुढचे तीन ते चार दिवस विविध भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुढील चार दिवस राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, अशा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे.

अशी असणार आहे राज्यातील पावसाची परिस्थिती
19 सप्टेंबर- राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्याला 19 सप्टेंबर रोजी पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.

20 सप्टेंबर- पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया (यलो अलर्ट)

21 सप्टेंबर- पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड औ,रंगाबाद, जालना, बीड, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, , गोंदिया (यलो अलर्ट)

22 सप्टेंबर- 22 सप्टेंबर- पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली (यलो अलर्ट)

पुढील चार ते पाच दिवस म्हणजे २२ सप्टेंबरपर्यंत राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. असे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.