अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लढा देत असतानाच आता पुन्हा एक संकट उभं ठाकलं आहे. पुढच्या 48 तासांत ‘हिका’ चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार असून सिंधुदूर्ग आणि कोकण किनारपट्टीवरून हे वादळ जाणार असून गुजरातच्या किनारपट्टीलाही धोका आहे.
ताशी 120 किमी वेगाने वारे वाहतील असं हवामान खात्याने म्हटलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने हे चक्रिवादळ निर्माण झालं आहे.
किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. तर मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.
3 जूनच्या सुमारास हे वादळ गुजरातमधून महाराष्ट्रात येईल असंही हवामान खात्याने म्हटलं आहे. सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्या जवळून चक्रीवादळ जाण्याचा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews