अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुंबईतील गोरेगावमधल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये चाललेल्या सेक्स रॅकेट पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन अभिनेत्रींनाही अटक करण्यात आली आहे. अभिनेत्रीही तिथे सापडल्यामुळे एकच खळबळ उडालीय.
गोरेगावमधील संबंधित फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा मारत कारवाई केली.
त्यानंतर पोलिसांमधील एका कर्मचाऱ्याने ग्राहक बनून सेक्स रॅकेटमध्ये सामील असलेल्या तरुणीशी संपर्क केला.त्यानंतर सेक्स रॅकेटसाठी पैसे स्वीकारतानाच पोलिसांनी तरुणीला अटक केली.
ही तरुणी बॉलिवूड अभिनेत्री असल्याचं समोर आलं आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. ‘सेक्स रॅकेटप्रकरणी 32 वर्षीय आणि 26 वर्षीय तरुणींना अटक करण्यात आली आहे. याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे,
पोलिसांनी कारवाई करत मुलींना देहविक्री व्यवसायात ढकलणाऱ्या बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे.
अमृता धनोआ आणि रिचा सिंग अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यामधील रिचा सिंग ही मॉडेल म्हणून ओळखली जाते.