एकरी उसात घेतले उच्चांकी उत्पादन; अमर पाटील यांची यशोगाथा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- महाराष्ट्रात सर्वात जास्त उसाचे उत्पादन पश्चिम महाराष्ट्रात घेतले जाते. या भागात उसाच्या कारखान्यांमुळे येथील अर्थकारण आणि राजकारण उसवरच चालत.

सांगलीमधील प्रयोगशील शेतकरी अमर पाटील यांनी जवळपास एक एकर शेतीत १३० टन उच्चांकी उसाचे उत्पादन घेतले गेले. तंत्रज्ञानाचे योग्य व्यवस्थापन करून चिकाटीने त्यांनी शेतात मास्तरकी मिळवली आहे.कधीकाळी त्यांच्या शेतात चाळीस पन्नास टन उसाचे उत्पादन घेतले जायचे, आज तिथेच १३० टनापर्यंत उत्पादन घेतले जाते.

अमर पाटील मूळचे सांगली जिल्ह्यातील निपाणी गावचे. एकत्रित कुटुंब असल्यामुळे त्यांच्याकडे ३८ एकर क्षेत्र होत. कोरडवाहू असलेलले गाव मागच्या काही वर्षांमुळे पाणी पाणीदार झाले आहे.बारावीपर्यंत घेतलेल्या पाटील यांनी शेतीची धुरा त्यानंतर आपल्या खांद्यावर घेतली. पडीक असणाऱ्या जमिनीवर यांनी विविध प्रयोग चालू केले.

जमीन पाण्याखाली आणून त्यांनी ऊस शेतीला सुरुवात केली. याला हातभार म्हणून पाईपलाईन आणि ठिबक पण चालू केले. सुरुवातीला त्यांच्या शेतात ३० ते ४० टन उसाचे उत्पादन व्हायचे.

त्यानंतर मग त्यांनी शास्रशुद्ध अभ्यास केला. त्यांना कळले कि ऊस काढल्यानंतर उरणारे उसाचे पाचट आणि इतर पालापाचोळा नवीन पिकासाठी वापरलातर उत्पादनावर त्याचा चांगला परिणाम होतो. त्यांनी आपल्या पुतण्याच्या मदतीने यावर अभ्यास केला.

त्यांनी नवं नवीन प्रयोग केले तसे एकरी ५० ते ६५ पुढे ९० ते ९५ टक्के आणि अगदी अलीकडे एकरी १३० टनापर्यंत त्याचे उत्पादन गेले आहे. अमर नेहमी शेतात ऊसाचा खोडवा ठेवतात. एकदा ऊस तुटल्यानंतर परत ऊस लावत नाहीत तर त्यावर हळद किंवा रताळाचे पीक घेतात. हे करत असताना एकरी 25 टन कंपोस्ट विस्कटले जाते.

तीन टन कोंबडी खत आणि दोन टन कारखान्याची राख विस्कटले जाते. पुन्हा नांगरणी आणि सरी करून रान तापवले जाते. खतांचे योग्य व्यवस्थापन करून नत्र, स्फुरद, पालाश आणि विरघळणाऱ्या जिवाणूंचा वापर करून उसाची लागवड केली जाते.

ऊस शेतीतील धडपड, प्रयत्न, आणि नविन प्रयोग यांची दखल घेत त्यांना अनेक संस्थांनी विविध पुरस्कारांनी गौरवले आहे. यासाठी विविध मार्गदर्शक आणि विकसनशील शेतकरी सहकाऱ्यांचे मला मार्गदर्शन मिळाले आहे असे ते आवर्जून सांगतात. सध्या तरी यावर्षी त्यांनी एकरी 151 टन उत्पादन घेण्याचे ध्येय ठेवून त्याप्रमाणे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24