परप्रांतीय मुलीला घेवून चालू होता हायप्रोफाइल वेश्याव्यवसायावर, अखेर पोलिसांनी केली ही कारवाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवर अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या हायप्रोफाइल वेश्याव्यवसायावर छापा पोलिसांनी छापा टाकला आहे.

या छाप्यामध्ये पोलिसांनी एका परप्रांतीय मुलीची सुटका केली असून वेश्याव्यवसाय चालवणार्‍या अमर उर्फ विकी गोपालदास सोळुखे याला ताब्यात घेतले आहे.

शहरातील गुलमोहर रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे उपाधीक्षक मिटके, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ, पोलीस हवालदार निपसे, पोलीस नाईक मिरपगार, फसले, पोलीस हवालदार लहारे,

खरात, महिला पोलीस हवालदार गायकवाड, भगत, सुद्रीक यांनी मिळून गुरूवारी (दि. 2) रात्री आठच्या सुमारास अपार्टमेंटमध्ये छापा टाकला. एका परप्रांतीय महिलेची सुटका करण्यात आली. तर अमर सोळुखे याला ताब्यात घेतले आहे.

रात्री उशीरापर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात वेश्यव्यवसाय चालविणार्‍या सोळुखेविरूद्ध स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा 1956 च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24