अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना नुकतेच करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान देशमुख हे कोरोनाग्रस्त असूनही त्यांच्या एका कार्यामुळे ते चर्चेचे केंद्रबिंदू बनले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नागपुरात रविवारी नव्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला.
यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या अनिल देशमुख यांची चांगलीच चर्चा रंगली होती. अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान नुकतेच झाले होते.
मात्र, तरीही अनिल देशमुख यांनी आजारपण बाजुला सारून या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षविस्तार अजेंडा फॉर्मात असल्याची चर्चा आहे. यावेळी अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधितही केले.