अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-दारूबंदी, भ्रष्टाचार, अवैध धंदे अशा प्रवृत्तींना आळा बसावा यासाठी कार्य करणाऱ्या पारनेर तालुक्यातील निघोज मधील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या घराची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली आहे.
दरम्यान हि घटना काल रात्री १२ : ३०च्या दरम्यान घडली. याबाबत सामाजिक कार्यक्रते बबन कवाद यांनी अधिक माहिती दिली.
त्यांनी सांगितले कि, यांच्या घरी काही चोरीच्या नावाखाली काही समाजकंटक आले त्यांनी प्रथम सीसीटीव्ही कॅमेरे फोडले नंतर घराची खिडकी फोडून आत जाण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर खिडकी तोडण्याचा आवाज झाल्यावर बाळासाहेब कवाद यांना जागा आली त्यांनी आपले शेजारी आणि पोलिसांना फोनवरून ही माहिती दिली.
पोलिसांसह शेजारी तातडीने कवाद यांच्या मदतीला आले असता चोरांनी तीथुन पळ काढला. चोर चपला आणि इतर साहित्य टाकून अंधाराचा फायदा घेवून पळाले.
निघोज पोलिसांनी घटनास्थळी तातडीने भेट देवून या चोरांचा शोध घेण्याचे आश्वासन दिले. या सर्व घडामोडी नंतर बबन कवाद म्हणाले माझ्या घरी आलेले चोरटे नसुन काही समाजकंटक असावेत ते माझ्या कुटुंबीयांवर दहशत निर्माण करत असावेत असा संशय माझा आहे.
यापुर्वीही असे प्रकार घडले आहे. आम्ही भ्रष्ट्राचार आणि अवैध धंदे यांच्या विरोधात असल्याने दुखावलेले समाजकंटक असा मार्ग निवडत आहेत. मी निघोज मध्ये राहत नसुन माझ्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved