Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Honda SUV : Creta, Seltos ला टक्कर देण्यासाठी येतेय होंडाची शक्तिशाली SUV, बुकिंग रक्कम असेल फक्त…

Honda SUV : भारतीय बाजारात अनेक कंपन्या कार लॉन्च करत आहेत. मात्र आता बाजारात होंडा त्यांची पहिली अशी कार लॉन्च करणार आहेत, जी कार थेट Creta, Seltos ला टक्कर देणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ही एक अशी कर असेल जी कमी किंमतीत दमदार फीचर्स देईल. यामुळे ग्राहकांची या कारला अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार या SUV चेअनधिकृत बुकिंग घेणे सुरू केले आहे. बुकिंग तपशीलांपासून संभाव्य वैशिष्ट्यांपर्यंत सर्व माहिती तुम्ही खाली सविस्तर जाणून घ्या.

होंडा एलिव्हेट बुकिंग रक्कम

डीलरच्या म्हणण्यानुसार, सध्याचे Honda ग्राहक ज्यांच्याकडे आधीच WR-V आणि City आहेत त्यांच्याकडे आगामी Elevate SUV बद्दल अधिक चौकशी केली जात आहे. काही डीलर्सनी अनधिकृत बुकिंगही सुरू केले आहे. डीलरच्या म्हणण्यानुसार, त्याचे बुकिंग 11 हजार रुपयांपासून ते 21 हजार रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आले आहे.

टीझर इमेजमध्ये काय दिसले?

टीझर इमेजमध्ये दिसणार्‍या इतर गोष्टींबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात रूफ रेल्स, शार्प-फिन एंटीना आणि बॉडी कलर ओआरवीएमचा समावेश आहे. कारच्या मागील बाजूस एलिव्हेट बॅजिंगसह टेललाइट्स जोडणारी LED पट्टी मिळते.

सनरूफ वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल?

कंपनीने नुकताच एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये वाहनाचे छत दाखवले आहे. जेथे सनरूफ स्पष्टपणे दिसू शकते. कंपनीने सादर केलेल्या चित्रावरून हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे की होंडा एलिव्हेट सनरूफसह ग्राहकांमध्ये लॉन्च केली जाईल.

कार निर्मात्याने शेअर केलेले चित्र एलिव्हेट एसयूव्हीचे शार्प डिझाइन घटक दाखवते. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की होंडा एलिव्हेटसह पॅनोरॅमिक सनरूफ देणार नाही.