नागपूर : वेटर कडून हॉटेल मालकाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे . नागपूर जिल्ह्यातील देवलापार इथे काल ही धक्कादायक घटना घडली.
केवळ पांघरायला चादर न दिल्याच्या रागातून ही घटना घडली. प्रकाश बालगोविंद जयस्वाल असं 53 वर्षीय दुर्दैवी हॉटेल मालकाचं नाव आहे. प्रकाश जयस्वाल यांचं वडंबा शिवारात हॉटेल आहे. त्यांच्याकडे 50 वर्षीय कारा नारायण सिंह बावद नावाचा वेटर काम करत होता.
तो थोडा रागीट आणि लहरी स्वभावाचा होता. रात्री झोपल्यानंतर काराने पहाटे थंडी वाजत असल्याने त्याने मालक प्रकाशला चादर मागितली.
मात्र, प्रकाश यांनी चादर न दिल्याने, काराने त्यांना लाकडी काठीने मारुन गंभीर जखमी केले. या मारहाणीत जबर जखमी झालेल्या प्रकाश जयस्वाल यांचा काल दुपारी मृत्यू झाला.