अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :जिल्ह्यातील शॉपिंग मॉल्स वगळता हॉटेल्स, लॉजेस, गेस्ट हाऊस आदी आस्थापना त्यांच्या ३३ टक्के क्षमतेने विविध अटी व शर्तींचे काटेकोर पालन करुन दिनांक ८ जुलैपासून सुरु करता येतील, असे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.
कन्टेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी या आस्थापना सुरु करता येतील, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केलेल्या या आदेशात म्हटले आहे.
संबंधित आस्थापनापैकी ज्या आस्थापनांचा जिल्हा/नगरपालिका प्रशासनाकडून क्वारंटाईन सुविधांसाठी वापर केला जात आहे,
अशा ठिकाणी आस्थापनांमधील 33 टक्के क्षमता वगळता उर्वरित क्षमतेचा (६७ टक्के) अथवा पूर्ण क्षमतेचा जिल्ह व नगरपालिका प्रशासनाव्दारे अशा सुविधांसाठी वापर केला जावू शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य शासनाने कोरोना विषाणू (कोर्हीड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दि.13 मार्च 2020 पासुन लागू करुन खंड 2, 3, 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे.
त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोरोना (कोव्हीड 19) वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे
त्या कारणासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्य शासनाने राज्यात मिशन बिगिन अगेन संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
त्यास्तव अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू (कोविड 19) चा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणेकामी लॉकडाऊन संदर्भात सुधारीत मार्गदर्शक सुचनांसह प्रतिबंधात्मक आदेश यापूर्वीच दि. ३१ जुलै रोजीचे मध्यरात्रीपर्यंत लागू करणेत आलेले आहेत.
उद्यापासून परवानगी असणाऱ्या हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस इत्यादी आस्थापना यांनी खालील अटींचे पालन करणे बंधनकारक राहील.
यामध्ये या आस्थापनांनी त्यांच्या दर्शनी भागांत कोव्हीड 19 च्या प्रतिबंधात्मक उपायांसंबंधी पोस्टर्स, स्टैंडिज, ऑडिओ व्हिज्यूअल मिडीया व्दारे मार्गदर्शक तत्वे दर्शविणे आवश्यक आहे.
हॉटेल तसेच बाहेरील जागेमध्ये, पार्कीग लॉट इ. मध्ये गर्दीचे योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करावे. रांगा व्यवस्थापीत करण्यासाठी सामाजिक अंतरासह विशिष्ट खुणा करण्यात याव्यात.
प्रवेशव्दाराचे ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग अनिवार्य राहील. रिसेप्शन टेबल, जागा याठिकाणी संरक्षक काच असावी. रिसेप्शन, अतिथी खोल्या आणि सार्वजनिक जागांवर (लॉबी इत्यादी) पेडल
ऑपरेटेड हँड सेनिटायझर डिस्पेन्सर्स विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात यावे. वैयक्तिक संरक्षणासाठी फेस कव्हर्स/ मास्क, ग्लोव्हज इत्यादी हॉटेल्स स्टाफ व ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात यावेत,
असे स्पष्ट करण्यात आले आहे. हॉटेलमध्ये क्युआर कोड, ऑनलाईन फॉर्म्स, डिजीटल पेमेंट, ई-वॉलेट इत्यादींसारख्या कॉन्टॅक्टलेस प्रक्रियांचा चेक-इन, चेक-आऊट व ऑर्डरसाठी अवलंब करणे आवश्यक आहे.
लिफ्टनध्ये सोशल डिस्टन्सींगचा अवलंब करणेकामी अतिथींच्या संख्येस मर्यादा राहील. एसी / व्हेंटीलेशनसाठी सीपीडब्ल्यूडी मार्गदर्शक तत्वांनुसार एसी तापमान सेंटींग
24-30 डिग्री सेल्सीअस पर्यंत व सापेक्ष आर्द्रता 40-70 टक्के क्षेणीत असावे, ताजी हवा जास्तीत-जास्त आत येईल व पुरेसे क्रॉस व्हेंटीलेशन राहील,
अशी व्यवस्था असावी. केवळ लक्षणे नसलेल्या ग्राहकांना परवानगी असेल. ग्राहकांना फेस कव्हर्स मास्क, वापरत असल्यास प्रवेशास अनुमती राहील. फेस कव्हर्स। मास्क यांचा हॉटेलमध्ये नेहमी वापर करणे बंधनकारक राहील.
रिसेप्शनचे ठिकाणी ग्राहकांना आयडी कार्ड व प्रवास/ वै्यकियस्थिती इ. बाबतची माहिती नमूद असलेल्या सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म मध्ये देणे बंधनकारक राहील. ग्राहकांना आरोग्य सेतु अॅपचा वापर करणे बंधनकारक राहील.
हाऊस किपींग सेवांचा कमीत-कमी वापर करणे बाबत ग्राहकांना प्रोत्साहित करावे. रेस्टॉरंटसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. सामाजिक अंतराची खात्री करण्यासाठी नव्याने आसन व्यवस्था करावी.
ई-मेनू आणि डिस्पोजेबल पेपर नॅपकिन वापराबाबत प्रोत्साहित करावे. रुम सर्व्हींस किंवा टेकअवेज इ. बाबत प्रोत्साहित करावे. रेस्टॉरंट फक्त निवासी ग्राहकांसाठीच उपलब्ध राहतील.
गेमिंग आर्केइस / चिल्ड्रेन प्ले एरिया / स्विमींग पूल/ व्यायाम शाळा (जेथे असतील) बंद राहतील. मोठ्या प्रमाणात एकत्र येणे / मेळावे यांना परवानगी असणार नाही.
तथापी, सभागृहांचा वापर क्षमतेच्या 33 टक्के (जास्तीत-जास्त 15 व्यक्तींच्या) उपस्थितीस परवानगी राहील. साफसफाई, स्वच्छता व निर्जतकीकरण- प्रत्येक वेळी ग्राहकांनी खोली
रिकामी केल्यानंतर खोली आणि इतर सेवा क्षेत्राची स्वच्छता करावी. 24 तासांसाठी रुम रिकागी ठेवावी व वापर करु गये. ग्राहकांनी रुम सोडल्यानंतर सर्व ताग / टॉवेल्स इ. बदलण्यात यावेत.
शौचालय, मद्यपान आणि हात धुप्याचे ठिकाणे भाग इ. प्रभावीपणे वारंवार स्वच्छता करावी. सर्व ग्राहक सेवा क्षेत्र व सामान्य भागातील वारंवार स्पर्श केले जाणारे पृष्ठभाग ( डोअरनॉब्स, इलीव्हीटर बटने, हॅण्ड रेल्स,
बेंचेस, वॉशरुम फिक्सर्सची स्वच्छता आणि नियमित निर्जंतुकीकरण (1% सोडियम हायपोक्लोराईट वापरुन ) करावे. नियमीतपणे व काही अंतराने सर्व वॉशरुमची साफसफाई करावी.
ग्राहक व कर्मचा-यांव्दारा वापरण्यात आलेले फेस कव्हर्स / मास्क यांची योग्यरित्या विल्हेवाट लावावी. संशयीत किंवा पृष्ठी झालेल्या केस बाबत करावयाची कार्यवाही- आजारी व्यक्तींना इतरांपासून दूर खोलीमध्ये ठेवावे.
तातडीने नजीकच्या वैद्यकिय सुविधा (रुग्णालय/ क्लिनीक) किंवा राज्य किंवा जिल्हा हेल्प लाईनवर कॉल करुन कळविण्यात यावे.
नियुक्त केलेल्या सार्वजनिक आरोग्य प्राधिकरण (District RRT / treating Physician) यांच्या मार्फत जोखीम मूल्यांकन केले जाईल आणि त्यानुसार रुग्ण व्यवस्थापन,
त्याचे/तिचे संपर्क आणि निर्जतुकीकरणा बाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल. बाधीत रुग्ण सापडल्यास संपूर्ण आवाराचे निर्जतुकीकरण करावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
हा आदेश दि. ०८ जुलैपासून ते ३१ जुलै रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. कोणतीही व्यक्ती/ संस्था/ संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास
भारतीय दंड विधान संहिता (४५ ऑफ १८५०) च्या कलम १८८ नुसार दंडनिय / कायदेशिर कारवाईस व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतूदीनुसार पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews