महाराष्ट्र

गुंडगिरी किती दिवस सहन करायची, आमच्याकडेही खुंखार लोक.. मनोज जरांगेंचा धनंजय-पंकजा मुंडेंना ‘हा’ गंभीर इशारा

Published by
Ahmednagarlive24 Office

बीड मध्ये नुकतीच लोकसभेसाठीची निवडणूक पार पडली. धनंजय मुंडे व पंकजा मुंडेंना आता मनोज जरंगे पाटील यांनी इशारा दिला आहे. बीडच्या नांदुर घाट गावात रात्री झालेल्या दगडफेकीमध्ये जे जखमी झाले त्यांना भेटायला ते गेले होते त्यावेळी त्यांनी इशारा दिला.

माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र टाकत म्हणाले, मला सुद्धा धमकी दिली जात असून बघून घेऊ, कचाट्यात ये मारून टाकू अशा धमक्या येत आहेत. मला बीडमध्ये येऊ द्यायचं नाही असे ते म्हणत आहेत पण आता तर मी रोज बीडमध्ये येईल असेही ते म्हणाले.

कार्यकर्त्यांना ते दोघे बहीण-भाऊ माझ्या विरोधात पोस्ट टाकायला लावत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणाला नाव ठेवले तरी देखील एकदाही आम्ही म्हणालो नाही की पंकजा ताईला पाडा किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार पाडा.

पण आम्ही हे जाणून होतो की, वेळ निघून गेल्यावर अशा गोष्टी होणारच. मी मागे हटणाऱ्यांतला नसून मी बलिदान देण्यासाठी तयार असल्याचे ते म्हणाले. जर तुम्ही मला बीडला येऊ दिले नाही, तर तुमच्या नेत्यांनाही महाराष्ट्रात जायचे आहे. तुमची गुंडगिरी आम्हाला किती दिवस सहन करावी लागेल,

आमच्याकडेही खुंखार माणसं आहेत. मराठा समाज तसा लेचापेचा नाही, तुमच्या नेत्यांनाही महाराष्ट्र आणि मुंबई, पुणे, संभाजीनगर मध्ये यायचे आहे. मला बीडला येऊ देणार नाहीत, असे सांगत आहेत. मराठा समाजाचे उपकार अशा पद्धतीने फेडता का असे ते म्हणाले. मते मराठ्यांची लागतात, प्रचारासाठी मराठा नेते लागतात, मराठ्याच्या मतांवर मोठे व्हावे लागते पण अन्याय हा प्रत्येकवर्षी सुरूच आहे असा घणाघात त्यांनी केला.

 

Ahmednagarlive24 Office