महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : सरकार आणखी किती मुडदे पाडणार ? मनोज जरांगे यांचा सवाल

Published by
Ahmednagarlive24 Office

Manoj Jarange Patil : आरक्षणाच्या वेदना घेऊन आलेले मराठा बांधव जखमी झाले आहेत. आरक्षणासाठी यापूर्वी ४५ जणांचे बळी गेलेले आहेत. सरकारला आजून किती बळी घ्यायचे आहेत, किती मुडदे पाडायचेत,

याचा विचार सरकारने करणे गरजेचे आहे; मात्र २४ तारखेनंतर आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

जरांगे यांच्या नाशिक जिल्ह्यातील येवला येथील सभेच्या वेळी फुलांची उधळण करताना जेसीबीच्या बकेटमधून पडल्याने दोन मराठा समाज बांधव जखमी झाले होते.

त्यापैकी येवला तालुक्यातील नेवरगाव येथील गोकूळ कदम यांना उपचारार्थ कोपरगाव येथील एसजेएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. त्यांची भेट घेण्यासाठी मंगळवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास जरांगे कोपरगाव येथे आले होते. रात्रीच्या वेळीही मराठा समाज बांधवांनी त्यांचे उत्स्फुर्त स्वागत केले.

यावेळी जरांगे म्हणाले, जे जखमी झालेत त्यांच्या वेदना वाया जाऊ द्यायच्या नाहीत. आम्हाला आरक्षण दिल्यास वेदना सहन करण्याची वेळ येणार नाही. मागील ७० वर्षांपासूनच्या सरकारचे पाप आम्हाला भोगायची वेळ आली आहे.

आता आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. यापुढील आंदोलनाची दिशा २२ रोजी जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. आरक्षणाविरूद्ध बोलणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांनी आता बोलायचे सोडले आहे,

ते आरक्षणावर बोलले की, आम्हीही सुरू होणार. तेच नाही, कोणीही असो, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणारांना सोडणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.

Ahmednagarlive24 Office